NPS बाबत संपूर्ण माहिती

केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 पासून तत्कालीन 'डीफाइन्ड बेनिफिट रेशर करून नेशनल पेन्शन सिस्टीम' नावाची 'डीफाइन्ड कॉन्ट्रीब्यूशन पेन्शन' योजना दाखल केली. ही योजना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची होती. बऱ्याच राज्य सरकारांनीसुद्धा ही योजना आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली. पाच वर्षांनंतर ही योजना १८ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व भारतीयांना उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक भारतीयाला आपल्या निवृत्तीचे नियोजन करता यावे, या उद्देशाने ही योजना दाखल करण्यात आली.


जर आपलीयला Nps चे सर्व G.R DOWNLOAD करायचे असेल तर येथे क्लिक करा


NPS बाबत संपूर्ण माहिती योजनेची वेगळी रचना:


या योजनेतील परतावा शेअर बाजाराशी संलग्न असतो. ही योजना तुमचे पैसे इक्विटी (शेअर), कंपन्यांचे कर्जरोखे, सरकारी कर्जरोखे (बाँड) यात प्रामुख्याने गुंतवणूक करते. त्यासाठी पेन्शन फंड मॅनेजर नेमलेले असतात. निवृत्तीच्या वेळी म्हणजे साठाव्या वर्षी जमा झालेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम आपण काढून घेऊ शकतो व त्यावर कर भरावा लागत नाही. ४० टक्के रकमेतून मान्यताप्राप्त विमा कंपनीकडून ॲन्युइटी खरेदी करावी लागते व त्यातूनच आपल्याला दरमहा पेन्शन मिळते, जे करपात्र असते. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर करसवलतीसुद्धा मिळतात. गेल्या दशकाचा विचार केल्यास, यातील इक्विटी योजनांनी १३ ते १४ याचाच अर्थ या योजनांनी महागाईवर मात केली आहे. उतारवयात आपल्या मुलावर, नातेवाइकांवर अवलंबून न राहता, कमाईच्या काळात नियमित गुंतवणूक केल्यास 'एनपीएस' योजना हीच आपली 'म्हातारपणाची खरी काठी' ठरू शकते! देशाची लोकसंख्या विचारात घेता, सभासदांची संख्या खूपच कमी आहे. याला एक महत्त्वाचे कारण म्हणजे या योजनेची माहिती व फायदे लोकांपर्यंत अजूनही पोचलेले नाहीत व या योजनेबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत, ते दूर करणे गरजेचे आहे.अलीकडेच काही राज्यांनी राजकीय हेतूने परत एकदा जुनी योजना म्हणजे 'डीफाइन्ड बेनिफिट' योजना आणावी, अशी मागणी केली आहे; परंतु केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या नियमांनुसार हे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कित्येक राज्यांची आर्थिक परिस्थिती आधीच नाजूक असून, त्यात पेन्शनची भर पडल्यास विकासकामांना खीळ बसेल. असे केंद्र सरकारला वाटते.

NPS बाबत संपूर्ण माहिती योजनेची ठळक वैशिष्ट्ये...


१.रचना : या योजनेचे नियमन व नियंत्रण पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ही संस्था करते, तर परिचालन म्हणजे ऑपरेशन्स 'एनपीएस ट्रस्ट' करतो. खात्यासंबंधित कामे सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी करते. त्यासाठी कॅम्स, के फिनटेक व प्रोटिआन म्हणजे 'एनएसडीएल' यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ही कस्टोडियन व डिपॉझिटरी म्हणून काम करते. प्रमुख सरकारी बँका; तसेच स्टॉक होल्डिंग कॉपोरेशनमार्फत इता येते; ज्यांना पॉईंट ऑफ प्रेझेन्स-सर्व्हिस म्हणण्यात येते. हे खाते ऑनलाइनसुद्धा उघडता येते त्याला 'ई-एनपीएस' असे म्हणतात.
२. कोण उघडू शकते? : १८ ते ७० वर्षे वयोगटातील व्यक्ती एकट्या नावावर खाते उघडू शकते. अनिवासी भारतीयसुद्धा खाते उघडू शकतात. एक व्यक्ती एकच खाते उघडू शकते. खाते उघडल्यावर तुम्हाला 'परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर' म्हणजे 'प्रान' देण्यात येतो. हा बारा आकडी नंबर पोर्टेबल असतो, म्हणजेच तुम्ही नोकरी अथवा ठिकाण बदलले तरी तो कायम राहतो. नामांकन सुविधा असते.
३. खात्याचे प्रकार : 'एनपीएस' खात्याचे दोन प्रकार आहेत- टीअर वन आणि टीअर टू. 'टीअर वन' हे निवृत्तिनिधीसाठी, तर 'टीअर टू' बचतीसाठी. खाते उघडताना कमीत कमी रुपये पाचशे व रुपये एक हजार अनुक्रमे भरावे लागतात व खाते चालू ठेवण्यासाठी वर्षात कमीत कमी एकदा एक हजार रुपये 'टीअर वन' खात्यात भरावे लागतात. यातील पैसे निवृत्तीच्या वेळेसच काढता येतात. 'टीअर टू' खात्यात कधीही पैसे ठेवता, काढता येतात व त्यावर परतावाही चांगला मिळू शकतो.
४. असेट क्लास : या योजनेमार्फत इक्विटी शेअर, कंपन्यांचे कर्जरोखे व सरकारी कर्जरोखे; तसेच पर्यायी गुंतवणूक (रिट, इनव्हिट) यात गुंतवणूक केली जाते.
५. ऑटो चॉइस-अॅक्टिव चॉइस : आपल्याला किती गुंतवणूक इक्विटी- शेअरमध्ये, किती खासगी कंपन्यांच्या कर्जरोख्यांत व किती सरकारी कर्जरोख्यांत करायची आहे, ते आपण स्वतः ठरवू शकता, ज्याला 'अॅक्टिव्ह चॉइस' असे म्हणतात. ते आपल्याला नको असेल, तर वयाच्या पस्तिशीनंतर आपले अॅसेट अॅलोकेशन वयानुसार बदलण्यात येते, ज्याला 'ऑटो चॉइस' असे म्हणतात. पस्तिशीनंतर इक्विटीचे प्रमाण दरवर्षी कमी करण्यात येते व डेटचे वाढविण्यात येते. आपण वर्षातून दोनदा ॲलोकेशन बदलू शकता.
६. पेन्शन फंड मॅनेजर : एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, एलआयसी, एसबीआय, यूटीआय, बिर्ला सन लाइफ, मॅक्स, टाटा, अॅक्सिस यापैकी एकाला आपण पेन्शन फंड मॅनेजर म्हणून नेमू शकता. या फंड मॅनेजरची कामगिरी 'एनपीएस ट्रस्ट'च्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. आपण वर्षातून एकदा फंड मॅनेजर बदलू शकता.
७. पार्शल विथड्रॉवल : या योजनेची मुदत निवृत्तीपर्यंतची असली, तरी ठराविक उद्दिष्टांसाठी पाच-पाच वर्षांच्या अंतराने आपण जमा केलेल्या रकमेच्या एकूण २५ टक्क्यांपर्यंत रक्कम मुदतपूर्तीच्या आधी तीन वेळा काढू शकता. उदाहरणार्थ, मुलांचे शिक्षण, लग्न, घरखरेदी, आजारपण, स्टार्टअपसाठी, कौशल्य विकासासाठी.
८. खर्च : या योजनेचा खर्च कमी असून, खाते उघडण्याचा, वार्षिक खर्च व प्रत्येक व्यवहाराचा खर्च युनिट मोडून दर तीन महिन्यांनी वसूल करण्यात येतो.
९. मुदतपूर्व खाते बंद : या योजनेचा 'लॉक-इन' दहा वर्षांचा असतो. निवृत्तीआधी खाते बंद केल्यास २० टक्के रक्कम काढता येते व ८० टक्के रकमेची अॅन्युइटी (पेन्शन) घ्यावी लागते. स्वयंरोजगार असलेली व्यक्ती पाच वर्षांनंतर खाते बंद करू शकते. खातेदार मृत झाल्यास जमलेली सर्व रक्कम तिने नामांकन केलेल्या व्यक्तीला देण्यात येते.
१०. ज्येष्ठ नागरिकांना संधी : हे खाते उघडण्यासाठी पूर्वी वयोमर्यादा ६५ वर्षे होती; जी ऑगस्ट २०२१ पासून ७० वर्षे करण्यात आली आहे, त्यामुळे ६५ ते ७० वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक खाते उघडून ७५ वर्षांपर्यंत बचत करून ७५ वर्षांनंतर ॲन्युइटी खरेदी करून नियमित पेन्शन मिळवू शकतात. गरज पडल्यास तीन वर्षांच्या आत खाते बंद करता येते व त्यावेळी जमा झालेली रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या आत असल्यास अॅन्युइटी खरेदी करावी लागत नाही. तीन वर्षांनंतर 'टीअर वन' खाते बंद केले व जमलेली रक्कम पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास अॅन्युइटी खरेदी करावी लागत नाही. ज्या ज्येष्ठ नागरिकांची 'कलम ८० सी'ची मर्यादा पूर्ण झाली आहे, असे नागरिक दरवर्षी रुपये ५० हजार गुंतवून आपापल्या टॅक्स ब्रॅकेटप्रमाणे २,५००/१०,०००/१५,००० रुपयांची करबचत करू शकतात.
११. कर सवलती : कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्यूशन- मूळ पगार अधिक महागाई भत्ता यांच्या दहा टक्क्यांपर्यंत प्राप्तिकर कायद्याच्या 'कलम ८० सीसीडी (वन)' अंतर्गत वजावट मिळते, जी 'कलम ८०सीसीई'च्या रुपये एक लाख पन्नास हजारांच्या मर्यादेच्या आत असते.

मालकाचे कॉन्ट्रीब्युशन-

मूळ पगार अधिक महागाई भत्त्याच्या दहा टक्क्यांपर्यंत व शासकीय कर्मचाऱ्यांना 14 टक्के पर्यंत 'कलम ८० सीसीडी (२)' अंतर्गत, अमर्याद, रुपये एक लाख पन्नास हजारांच्या मर्यादे उपरांत वजावट मिळते. ऐच्छिक काँट्रीब्युशन 'कलम ८० सीसीडी १ बी' अंतर्गत रुपये पन्नास हजारांपर्यंत वजावट मिळते, जी रुपये १,५०,००० च्या मर्यादेव्यतिरिक्त असते. या सर्व सवलती 'एनपीएस वन' खात्यातील गुंतवणुकीसाठी मिळतात. 'टीअर टू' खात्यातील गुंतवणुकीला रुपये एक लाख पन्नास हजारांपर्यंत वजावट फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते; परंतु त्या गुंतवणुकीला तीन वर्षांचा लॉक-इन लागू होतो. ज्या व्यक्ती कर्मचारी नाहीत, अशा व्यक्तीसुद्धा एकूण रुपये दोन लाखांपर्यंतची वजावट मिळवू शकतात. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात सुखी, समाधानी व स्वावलंबी व्हायचे असेल, तर लवकरात लवकर नियमित व पुरेशी बचत व गुंतवणूककरावी लागते. त्यासाठी इतर गुंतवणूक पर्यायांबरोबरच 'एनपीएस'चा विचार जरूर करावा. हीच आपली म्हातारपणाची खरी (आर्थिक) काठी ठरू शकते!

*NPS SERVICES*

1) Update FACTA details

2) Update Email ID And Mobile Number

3) Reprint PRAN card

4) Change in Scheme Preference

5) Tier 1 and 2 withdrawal

6) View Account Details/Transactions Statement

🌐 Important link :-

1) Login and Set/Reset PRAN/IPIN  :

https://cra-nsdl.com/CRA/

2) DCPS/NPS Annual Statement आपल्या ईमेलवर प्राप्त करून घ्या... त्यासाठीची लिंक :

https://cra-nsdl.com/CRAOnline/asomPreLogin.html

HOW TO GENERATE PASSWARD FOR NSDL WEBSITE AND NSP MOBILE APP?

The procedure for setting of IPIN (Passward)and TPIN is as follows:
1. IPIN -
a. Visit the website www.cra-nsdl.com
b. Click on the menu - 'Forgot Password'
c. Select the option - Instant Set/Reset IPIN
d. Provide your PRAN and other relevant details and set your IPIN through One Time Password (OTP) which sent to your register mobile no.
Upon setting of IPIN, you can access the CRA website www.cra-nsdl.com for various activities such as viewing of Transaction Statement, changing of contact details, raising of grievance

You can download epran from above webseite.


2/Post a Comment/Comments

Post your comments here..

  1. खूप उपयुक्त व सविस्तर माहिती दिलीय . धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Post your comments here..

Previous Post Next Post

About Me

My photo
Qadeer Khan
Educational ways is a platform where we focus on Educational Softwares,Materials,Soft data,Quizes,Exam papers,text books etc. Specially for Urdu Medium/Marathi Medium in Maharashtra and whole India. facebook twitter youtube whatsapp
View my complete profile